हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा २०१९ सालच्या सर्वोत्तम खेळाडूचा पूरस्कार
भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं २०१९ सालचा वर्षातला सर्वोत्तम खेळाडू हा पूरस्कार दिला आहे.
हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. बेल्जिअमचा आर्थर वॅन डोरेन हा दुसरा तर अर्जेंटिनाचा लुकास विला याला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
Credit – AIR