Sadhavi Pradnya Singh Thakur
हेमंत करकरेंचा मृत्यू माझ्या शापामुळे – साध्वी प्रज्ञा सिंग यांचं खळबळजनक विधान
भोपाळ : सन २००८ च्या २६/११ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पहिल्या एका तासातच मुंबई ATS प्रमुख हुतात्मा हेमंत करकरे अतिरेक्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले, ते माझ्या शापामुळे या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असे धक्कादायक विधान भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग या म्हणाल्या की,” सुरक्षा दलातील सदस्याने माझ्याविरोधात एकही पुरावा नाही त्यामुळे मला सोडायला हवं असं सांगून सुद्धा हेमंत करकरे म्हणाले की मी कुठूनही पुरावे गोळा करिन, अथवा तयार करिन पण साध्वीना सोडणार नाही. त्यांचे हे वागणे म्हणजे कुटीलता होती, देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. त्यांनी मला खूप वाईट शिव्या दिल्या, त्रास दिला मग मी त्यांना शाप दिला की तुमचा सर्वनाश होणार, आणि झालेही तसेच मी ज्या दिवशी गेली तेव्हा त्यांना सुतक लागलं आणि महिन्या-सव्वामहिन्यात अतिरेक्यांच्या हातून त्यांनाच मृत्यू झाला”
साधवींच्या या वक्तव्यावरून आता नव्याने वाद सुरू होणार आहे. काँग्रेस ने साध्वी प्रज्ञा सिंग विरोधात निवडणूक आयोग, तसेच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण आता या खळबळजनक वक्तव्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.
