Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रसिद्ध ‘हल्दीराम’च्या रेस्टॉरंट मध्ये सांबर मध्ये आढळलं पालीचं पिल्लू

प्रसिद्ध ‘हल्दीराम’च्या रेस्टॉरंट मध्ये सांबर मध्ये आढळलं पालीचं पिल्लू

नागपूर: हल्दीराम हे नाव तसं खाद्यविश्वात नवं नाही. पण सध्या हे नाव गाजतंय वेगळ्याच गोष्टीमुळे. नागपूर येथील ‘हल्दीराम रेस्टॉरंट’ मध्ये एका गिर्हाईकने मागवलेल्या खाद्यपदार्थात मृत पाल आढळल्याची घटना समोर आली आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार वर्धा येथे राहणारे यश अग्निहोत्री आपल्या परिवारा सोबत अजनी चौकातील हल्दीरामच्या खाद्यगृहात नाश्त्या साठी गेले होते. त्या वेळी त्यांनी मेदू वडा सांबार ही डिश मागवली. त्यांनी मागवलेल्या या डिश मधील सांबर मध्ये त्यांना एक मेलेलं पालीचं पिल्लू आढळलं. हा सांबार खाल्ल्यामुळे यश यांच्या घरातील दोन सदस्यांना इस्पितळात भरती करावं लागलं. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

यश अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून पालीचं एक छोटं पिल्लू स्पष्ट दिसत आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी चौकशीस सुरुवात केली आहे. या घटनेनेनंतर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. या घटनेमुळे ‘हल्दीराम’ च्या नावाला नक्कीच डाग लागला आहे असे म्हणावयास हरकत नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *