Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पृथ्वी संकटात; वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण पोहोचले गंभीर पातळीवर

पृथ्वी संकटात; वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड के प्रमाण पोहोचले गंभीर पातळीवर

पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि ते गंभीर स्थरावर पोहोचलं आहे. अमेरिकेमध्ये वैज्ञानिकांनी तपमानाला वाढवणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या उच्चतम स्तराचा शोध लावला आहे त्यानंतर मानवनिर्मित ग्रीन हाऊस गॅस च्या सतत वाढत्या उत्सर्जना बाबत चिंता अजूनच वाढली आहे.

‘हवाई’ येथील मौना लोवा अब्जर्वेटरी ने वर्ष १९५० च्या दशकापासून ते आतापर्यंत वातावरणातल्या कार्बन डायऑक्साइडच्या(CO2) च्या पातळीचा शोध लावला आहे. शनिवारी सकाळी सीओ२ ची पातळी ४१५.२६ पार्टस प्रति मिलियन(पीपीएम) मोजली गेली. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा अब्जर्वेटरी ला कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ४१५ पीपीएम पेक्षा अधिक आढळून आलं.
पोस्टाडैम इंस्टिट्यूट फ़ॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च च्या वाल्फगँग ने सांगितलं की, “असं दिसतं की आपण जलवायूचे संवर्धन करण्याबाबत योग्य दिशेने काम नाही करत आहोत. सीओ2 चं प्रमाण वर्षागणिक वाढतंच जात आहे. पण आता हे प्रमाण स्थिर करण्याची गरज आहे.
मागची चार वर्षे सलग रेकॉर्ड ब्रेक गरम वर्ष म्हणून घोषित झाली आहेत. पॅरिस करार तसेच एकूणच या समस्येला घेऊन केलेल्या जनजागृतीनंतरही माणूस उत्सर्जनाच्या आपल्याच विक्रमाला मोडत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *