Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘H2O’ कहाणी थेंबाची चा ट्रेलर प्रदर्शित

Featured Video Play Icon

‘H2O’ कहाणी थेंबाची चा ट्रेलर प्रदर्शित

पाण्याचं महत्व लोकांना पटवून देणारा H2O हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा चित्रपट पाणी या विषयावर प्रकाश टाकणार असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. H2O हा चित्रपटात केवळ दुष्काळावर भाष्य नसून प्रेम, मैत्री, वादविवाद यांच्यावरही चित्रित करण्यात आला आहे.

जी. एस. फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद पाटील करणार आहेत. सुनील झवर यांनी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. शितल अहिरराव, किरण पाटील, सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, अशोक एन.डी यांच्या प्रमुख भूमिका असलेला H2O हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *