उन्हाळा स्पेशल: पेरूचा ज्यूस
साहित्य:
पिकलेला पेरू, दोन चमचे साखर, छोटा आल्याचा तुकडा, एक चमचा लिंबाचा रस, एक ते दीड कप पाणी थंड पाणी, चवीनुसार मीठ
कृती:
प्रथम पिकलेला पेरू धुवून घ्यावा मग त्याची साल काढावी. पेरूच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. यानंतर या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकाव्यात. त्यासोबत आलं, मीठ, लिंबाचा रस व एक कप थंड पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरवावे. हे सर्व मिश्रण गाळून घ्यावे… ताजे थंडगार सरबत तयार..सर्व्ह करताना त्यावर थोडे पेरूचे बारीक तुकडे टाकावे. उन्हाळ्याच्या दिवसात फळाचे ज्यूस शरीरासाठी आरोग्यदायी असतात.