Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मे महिन्यात झाले जीएसटी करा चे विक्रमी संकलन; एकूण १,५७,०९० कोटी रूपयांचा जीएसटी झाला जमा

महाराष्ट्राटून सर्वात जास्त जीएसटी ची रक्कम जमा

मुंबई, दि. १: मे २०२३ या महिन्यात १,५७,०९० कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलित झाला असून त्यापैकी २८,४११ कोटी रूपये सीजीएसटी; 35,828 कोटी रुपये एसजीएसटी तर ८१,३६३ कोटी रुपये आयजीएसटी (वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या ४१,७७२ कोटी रुपयांसह) तर उपकर ₹ ११,४८९ कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या १,०५७ कोटी रुपयांसह) म्हणून जमा झाले आहेत.

सरकारने ३५,३६९ कोटी रुपये सीजीएसटी म्हणून तर २९,७६९ कोटी रुपये आयजीएसटीमधून एसजीएसटी अशी तडजोड केली आहे. या नियमित तडजोडीनंतर मे २०२३ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल ६३,७८० कोटी रुपये सीजीएसटीच्या रुपात तर ६५,५९७ कोटी रुपये एसजीएसटीच्या रुपात आहे.

मे २०२३ या महिन्याचे वस्तू आणि सेवा कर महसुलात संकलन मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुल संकलनापेक्षा १२% ने जास्त आहे. या महिन्यात जमा झालेला वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा १२% जास्त होता तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्यात याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा ११% जास्त आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील कल दर्शवितो. मे २०२२ च्या तुलनेत मे २०२३ मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटी ची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्ता दर्शवतो.

मे 2023 मध्ये जीएसटी महसुलात राज्यनिहाय झालेली वाढ.

State/UT May-22 May-23 Growth(%)
Jammu and Kashmir 372 422 14
Himachal Pradesh 741 828 12
Punjab 1833 1744 -5
Chandigarh 167 259 55
Uttarakhand 1309 1431 9
Haryana 6663 7250 9
Delhi 4113 5147 25
Rajasthan 3789 3924 4
Uttar Pradesh 6670 7468 12
Bihar 1178 1366 16
Sikkim 279 334 20
Arunachal Pradesh 82 120 47
Nagaland 49 52 6
Manipur 47 39 -17
Mizoram 25 38 52
Tripura 65 75 14
Meghalaya 174 214 23
Assam 1062 1217 15
West Bengal 4896 5162 5
Jharkhand 2468 2584 5
Odisha 3956 4398 11
Chattisgarh 2627 2525 -4
Madhya Pradesh 2746 3381 23
Gujarat 9321 9800 5
Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 300 324 8
Maharashtra 20313 23536 16
Karnataka 9232 10317 12
Goa 461 523 13
Lakshadweep 1 2 210
Kerala 2064 2297 11
Tamil Nadu 7910 8953 13
Puducherry 181 202 12
Andaman and Nicobar Islands 24 31 27
Telangana 3982 4507 13
Andhra Pradesh 3047 3373 11
Ladakh 12 26 113
Other Territory 185 201 9
Center Jurisdiction 140 187 34
Grand Total 102485 114261 11

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *