येत्या २५ नोव्हेंबरला ‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ चा पुराव्यानिशी होणार भांडाफोड
पुणे/मुंबई: साधारण महिन्याभरापूर्वी महाराष्ट्र वार्ताच्या ‘आपली समस्या’ टीम ने ‘ऑपरेशन ब्लॅक मार्ट’ अंतर्गत सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या पुणेस्थित ‘घरकुल एक्सप्रेस’ नामक एका MLM नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा भांडाफोड केला होता. यावेळी ही कंपनी कशाप्रकारे निरनिराळ्या स्कीम्स च्या माध्यमातून लोकांना मोठमोठाली स्वप्ने दाखवून त्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारते हे कथन केले होते. अशा प्रकारच्या योजना चालवणे हे विविध कलमांतर्गत बेकायदेशीर असूनही ही मंडळी राजरोसपणे अशा पोन्झि स्कीम्स राबवत आहेत. सदर बाब महाराष्ट्र वार्ता ने बातमीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या नजरेस आणून दिली होती.
येत्या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आम्ही ‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ या कंपनीचा पुराव्यानिशी भांडाफोड करणार असून त्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण व महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण महानिरीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार आहोत. याच सोबत पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या निदर्शनासही सदर प्रकरण आणणार आहोत ज्यायोगे भविष्यात अशा कंपन्या चालवण्याची हिम्मत कोणी करणार नाही.
मागील बातमीची लिंक :
आपल्या अवती-भवती ही अशाच प्रकारच्या घोटाळेबाज कंपन्यांचे उद्योग चालू असतील तर आम्हाला news@maharashtravarta.com वर मेलद्वारे व 9372236332 वर व्हाट्सआप द्वारे पुराव्यानिशी माहिती द्यावी आम्ही नक्कीच त्याची दखल घेत पोलीस यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधू.
मागील बातमीची लिंक :
‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश
आपल्या अवती-भवती ही अशाच प्रकारच्या घोटाळेबाज कंपन्यांचे उद्योग चालू असतील तर आम्हाला news@maharashtravarta.com वर मेलद्वारे व 9372236332 वर व्हाट्सआप द्वारे पुराव्यानिशी माहिती द्यावी आम्ही नक्कीच त्याची दखल घेत पोलीस यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधू.
