Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची तब्बल १२७ वर्षांनी ‘ही’ परंपरा खंडित

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्याचा घेतला निर्णय

पुणे, दि. ११: गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे समाजहित आणि भक्तांच्या आरोग्याचा विचार करून यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी कोतवाल चावडी इथं दगडूशेठ गणपतीची उत्सवात प्रतिष्ठापना होत असते.मात्र,गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे.

बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर आणि ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील काही मंडळं मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करतील.पण, ज्यांच्याकडे मंदिर नाही. त्यांच्यासाठी छोट्या मंडपाची परवाननी महापालिकेने द्यावी अशी विनंती गोडसे यांनी यावेळी केली. पुणे शहरात दरवर्षी घरोघऱी मिळून पाच लाख श्रींच्या मुर्तींची प्रतिष्ठापना होते. परंतू यंदा कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी श्रींच्या मूर्तीचं विसर्जन घरच्या घरीच करावं. यंदा नदीच्या घाटांवर हौद बांधले जाणार नाहीत. असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितलं.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *