गणेश नाईक ठाण्यातून लोकसभा लढवणार असल्याची सर्वत्र चर्चा
राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी आरोग्यमय नवी मुंबई आणि स्वच्छ पर्यावरण पूरक नवी मुंबईचा संदेश देण्यासाठी रविवारी नवी मुंबई महासायक्लोथॉनचं आयोजन केले होते.
नवी मुंबई महासायक्लोथॉन कार्यक्रमावेळी आपण ठाणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतःच दिले. “वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो,” असे विधान गणेश नाईक यांनी या वेळी केले. या विधनाबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात नाईक यांच्या या
विधानामुळे ठाण्याच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट आलाय.
राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ठाण्यातून गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. तसेच ठाण्यातून गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पवारांच्या या इच्छेवर मात्र नाईक कुटूंबियांकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. पण, आता नाईकांच्या या विधनानंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या लोकसभा रणांगणात उतरुन निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
