‘गनेस गायतोंडे’ आ रेहला है…१५ ऑगस्ट ला रिलीझ होतोय “सेक्रेड गेम्स 2”
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोस्ट अवेटेड “सेक्रेड गेम्स” चा दुसरा भाग येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेले बरेच महिने याची चर्चा चालू होती. या भागात आपल्याला सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी या पहिल्या सिझन च्या कलाकारांसोबत कल्की कोचलीन व रणवीर शौरी हे नवीन मेम्बर यात ऍड झालेले दिसत आहेत. पहिल्या सिझन चं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाणी यांनी मिळून केलं होतं. पण दुसरा सिझन अनुराग कश्यप व नीरज घेवानी यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्या सिझन ने फुल्ल टु धुमाकूळ घातला होता. या सिझन मध्ये काय काय दाखवलं जाणार आहे याबाबत फॅन्स मध्ये फारच उत्सुकता आहे.
