Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘फनी’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने रवाना, समुद्रकिनारी हाय अलर्ट घोषित

‘फनी’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने रवाना, समुद्रकिनारी हाय अलर्ट घोषित

‘फनी’ वादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. तामीळनाडूला भेडसावत असलेले फनी हे चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार असून त्याचा फटका तामीळनाडू आणि ओडिशा या राज्यांना बसणार आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार, सध्या हे वादळ त्रिकोमालीच्या (श्रीलंका) पूर्वेकडे ६२० किलोमीटरवर, चेन्नईच्या (तामिळनाडू) आग्नेय दिशेला ८८० किलोमीटरवर आणि मछलीपटणमच्या (आंध्र प्रदेश) दक्षिण-आग्नेय दिशेला १०५० किलोमीटरवर असून येत्या सहा तासांत हे चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करण्याची आणि पुढील २४ तासांत अतितीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. तसेच हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण(NDRF) आणि भारतीय तटरक्षक दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फनी चक्रीवादळाची तिव्रता लक्षात घेवून सरकारने एनडीआरएफ आणि भारतीय तट रक्षक दलाला अतिसावध राहण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. तामीळनाडूच्या राजली आणि आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे नौदलाच्या बोटी उभ्या आहेत. गरज पडल्‍यास या बोटींच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य करता येणार आहे. मच्छीमारांनी मंगळवारी फनी वादळ तीव्र स्वरूप धारण करण्याची अपेक्षा असल्यामुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *