JJ Annual Exhibition
सर जे. जे. कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन २०१९ ला सुरुवात
मुंबईतील नामवंत कला महाविद्यालय सर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ने सालाबादप्रमाणे वार्षिक कला प्रदर्शन २०१९ चे आयोजन केले आहे. ह्या प्रदर्शचा उदघाटन सोहळा १८ फेब्रुवारी रोजी झाला. ह्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. मीना नाईक (अभिनेत्री व दिग्दर्शिका), रेडिओ जॉकी अनघा मोडक आणि डॉ. संतोष क्षीरसागर (डीन) ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. हे प्रदर्शन उत्तमरित्या आयोजित करण्यात विघ्नेश जांगले, ऋषिकेश लोखंडे, मयुरी पाटील व शामिक खान ह्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. दिनांक २४ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. कलारसिक, कलाकार आणि कलाविद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाचा रसास्वाद घ्यावा.
प्रदर्शन : १९ ते २४ फेब्रुवारी ( सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३०)
ठिकाण : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट,
स्कूल ऑफ आर्ट कॅम्पस,
डॉ. डी. एन. रोड, फोर्ट,
मुंबई - ४००००१

(छायाचित्र सौजन्य : मेधा थळे-जोशी)
