Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मतदान ओळखपत्र नाहीये.. चिंता करू नका; मतदानासाठी ‘ही’ पर्यायी ओळखपत्रही तुम्ही सोबत ठेवू शकता

जाणून घ्या कोणती पर्यायी ओळखपत्र तुम्हाला वापरता येतील
मुंबई, दि. २४: ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत ते मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्राईव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेक कं. कर्मचाऱ्यांने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.
यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २० ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्ट मधील तपशीलांच्या आधारे ओळखले जातील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *