Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“माझा भरोसा धरू नका” थेट गोपीनाथ गडावरून एकनाथ खडसे यांचं भाजप सोडण्याबाबत संकेत देणारं वक्तव्य

“माझा भरोसा धरू नका” थेट गोपीनाथ गडावरून एकनाथ खडसे यांचं भाजप सोडण्याबाबत संकेत देणारं वक्तव्य

परळी: आज भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर वातावरण धगधगत होतं असं म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. त्याला कारणही तसंच होतं. भाजपचे सध्या राजकीय विजनवासात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेलं झंझावाती भाषण त्यांची भविष्यातील राजकीय दिशा दाखवून गेलं.

आपल्या भाषणात त्यांनी पक्षातील आपल्या नेत्यांचा विशेषकरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, “ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती. गोपीनाथ मुंडेंना जसा पक्षातील नेत्यांकडून काही वर्षांपूर्वी त्रास सहन करावा लागला तसा आता मला आणि पंकजा मुंडे यांनाही सहन करावा लागत आहे.” पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आलेला पाहायला मिळाला. आपण भाजपमध्ये राहू की नाही याची शाश्वती नसल्याचेही त्यांनी यावेळी खुलेआम सांगितले.

या सभेला माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रकाश मेहता, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार प्रीतम मुंडे, रासपचे महादेव जानकर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *