Earth Drought
राज्यात पुन्हा साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर !
महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली असून ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील यवतमाळ जिल्ह्य़ातील सर्वाधिक ७५१ गावांचा, तर अमरावती जिल्ह्य़ातील ७३१ गावांचा यामध्ये समावेश आहे.
त्याप्रमाणे पुणे- ८८, पालघर- २०३, अकोला- २६१, बुलढाणा- १८, वर्धा- ५३६, भंडारा- १२९, गोंदिया- १३, चंद्रपूर- ५०३, गडचिरोली- २०८, लातूर- १५९, सांगली- ३३, अमरावती- ७३१, यवतमाळ- ७५१, अहमदनगर- ९१, नांदेड- ५४९, धुळे ५०, नंदुरबार- १९१, अशा एकूण ४ हजार ५१८ गावांचा समावेश आहे.
या सर्व गावांमध्ये सरकारतर्फे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत तसेच त्यामध्ये जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामांच्या निकषांत शिथिलता, शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे, आवश्यक त्या भागात टँकरने पाणीपुरवठा, कर्जाचे पुनर्गठण इत्यादी आठ विविध प्रकारच्या सवलती राज्य सरकारने लागू केल्या आहेत.
