Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘डीआरआय’ने गुप्त माहिती च्या आधारे मुंबई विमानतळावर सिएरा लिओन देशाच्या नागरिकांकडून २० कोटी रुपयांचे कोकेन केले जप्त

‘डीआरआय’ने गुप्त माहिती च्या आधारे मुंबई विमानतळावर सिएरा लिओन देशाच्या नागरिकांकडून २० कोटी रुपयांचे कोकेन केले जप्त

मुंबई, दि. २५: नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार २४ मार्च २०२४ रोजी ताब्यात घेतले. या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता ती नेत असलेल्या वस्तू उदा. बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स हे विलक्षण जड होते. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

एकूण १९७९ ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे १९.७९ कोटी आहे. यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने भारतातील मादक द्रव्यांच्या धोक्याशी लढा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पूनरुच्चार केला तसेच, प्रतिबंधित अमली पदार्थ लपविण्याची नवीन पद्धत शोधून पुन्हा उच्च व्यावसायिक मानके स्थापन करण्यात रस दाखवला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *