Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंगाल मधील डॉक्टरांच्या संपाचे लोण आता देशभर, AIIMS च्या डॉक्टरांचे हेल्मेट घालून आंदोलन

बंगाल मधील डॉक्टरांच्या संपाचे लोण आता देशभर, AIIMS च्या डॉक्टरांचे हेल्मेट घालून आंदोलन

पश्चिम बंगाल मधून सुरू झालेला ज्युनिअर डॉक्टरांच्या संपाचे लोण आता देशभर पसरत चालले आहे. बंगाल मध्ये ज्युनिअर डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे मेडिकल असोसिएशन भडकली आहे. पश्चिम बंगाल मधील डॉक्टरांचं समर्थन करत महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, केरळ, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यातील डॉक्टरही संपात उतरले आहेत. ओपीडी मध्ये येणाऱ्या नव्या रुग्णांवर उपचार करण्यास त्यांनी मनाई केली आहे.

यात सर्वात हटके आंदोलन करत आहेत ते एम्स(AIIMS) चे डॉक्टर. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या निवासी डॉक्टर्स असोसिएशन च्या सदस्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी हेल्मेट घालून काम चालू ठेवले आहे.

डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “देशभरातील डॉक्टरांना मी त्यांनी केलेल्या संपाबाबत सांगू इच्छितो की सरकार तुमच्या सुरक्षेसाठी बांधील आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करावे व आपले काम चालू ठेवावे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *