धवल चोप्राचे उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई: “द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अंतिम परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईचा धवल चोप्रा देशातून तिसरा आला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी धवलचा मंत्रालयात सत्कार करून अभिनंदन केले.
