आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकऱ्यांना दिलेले बरे – धनंजय मुंडे
वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथे चारुलता टोकास यांच्या प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदी, पंकजा मुंडे यांच्यासह सत्तेत असलेल्या सरकारवर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे दिले असते तर बरं झालं असतं, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर कडकडून टीका केली.
मुंडे साहेबांचा वारस पंकजाताईच आहे मी स्वतःला कधीच त्यांचा वारस समजले नाही. साहेबाच्या वारसाचा ताईंनाच लखलाभ असावा, असेदेखील धनंजय मुंडे यावेळी बोलले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमावी व सर्व घोटाळ्याची चौकशी करावी असं आवाहन त्यांनी केलं.
