Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

फायरब्रँड नितीन नांदगावकरांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा

फायरब्रँड नितीन नांदगावकरांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नितीन नांदगावकर यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत माटुंगा विनयभंग प्रकरणातील आरोपीला प्रसाद देतानाच व्हिडिओ प्रसारित केला आहे ज्याच्या शेवटी ‘चुकीला माफी नाही’ अशी टॅग लाईन ठेवली आहे.

आपल्या शुभेच्छापर पोस्ट मध्ये ते लिहितात की, “जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
माता-भगिनींना समर्पित …..
महिलांची सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता …..

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महिलांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत राहणार …..
महिलांवरील अत्याचार थांबले गेलेच पाहिजे त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार ……
रयतेच्य राज्यात महिलांना मानसन्मान मिळणारच ……”

गेल्या महिन्यात माटुंगा रेल्वे पुलावर एक विकृत जाणाऱ्या येणाऱ्या महिलांचा विनयभंग करताना आढळला होता. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर या विकृताला नितीन नांदगावकर यांनी चांगलाच प्रसाद देत व्हिडिओ प्रसारित केला. ज्यांनंतर नांदगावकरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *