४०,००० कोटींच्या निधीबाबत भाजप खासदाराने केलेल्या गौप्यस्फ़ोटावर देवेंद्र फडणवीस म्हणाले पुराव्यानिशी बोलणे केव्हाही योग्य
कर्नाटक: माजी मुख्यमंत्री व नवनिर्वाचित विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अल्प कालावधीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कर्नाटक मधील भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले कि, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी होता. जर राज्यात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर हा निधी त्यांच्याकडे गेला असता.”देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यामागे हेच एक प्रमुख कारण होते हे सांगताना ते म्हणले कि, “राज्यात आपला माणूस (देवेंद्र फडणवीस) ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केले? आमच्याकडे बहुमत नसताना त्यांनी शपथ कशी काय घेतली हा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.”या साऱ्या वृत्ताचे देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले असून ५००० कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त केंद्राकडून असा कोणताच निधी आला नसल्याचे फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. परंतु या गौप्यस्फोटामुळे भाजपवर सर्व बाजूने टीकेची झोड उठायला सुरुवात झाली आहे.
No policy decision was taken in that period.
कोणताही धोरणात्मक निर्णय त्या काळात घेतला नाही!#Maharashtra pic.twitter.com/w8rzhB7bEf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2019
