राज्यातल्या पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा केला आरोप
मुंबई, दि. २३ : राज्यातल्या पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर होऊनही सरकार वाचवण्यासाठी अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी पुराव्यांसह एक अहवाल राज्यसरकारला सादर केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागणी करण्यासाठी आज संध्याकाळी दिल्लीत गृहसचिवांची भेट घेऊन त्यांना सर्व पुरावे सादर करणार असल्याची माहितीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही बदल्यांचे रॅकेट उघडकीस आणून त्याचा अहवाल २५ ऑगस्ट २०२० ला पोलिस महासंचालकांना सादर केला होता त्यावरही कारवाई न करता उलट शुक्ला यांनी बढती थांबवण्याचे प्रयत्नही झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पोलिस बदल्यांच्या कॉल रेकॉर्डचा ६.३ जीबी डाटा या अहवालाला जोडण्यात आला होता.
