मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या संदर्भातील माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत सर्वांना दिली.
शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरेजी यांची आज मातोश्री येथे भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2019
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम आटोपता घ्यावा असे शिवसेना-भाजप नेतृत्वाच्या मनात होते पण मंत्रीपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात नेत्यांची वर्णी लागू शकते याची कुणकुण लागताच सत्ताधारी आमदारांनी आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. या नाराजीमुळे माध्यमात व पक्षाच्या कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जायला नको म्हणून सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. असे मानले जाते की मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाप्रत हे दोन्ही नेते आले आहेत.
