BMC-Building-1
मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘वर्षा’ बंगल्याचं ७.५ लाख रुपयांचं बीएमसी च पाणी बिल थकीत; राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई: सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. यात सत्ताधारी विशेषतः भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस आरोपांची व प्रशांची सरबत्ती करताना दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तब्बल ७.५ लाखांचं पाण्याचं बिल थकवल्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. पण ७,४४,९८१ रुपयांची थकबाकी असल्याकारणाने महापालिकेने वर्षा बंगल्याला थकबाकीदारांच्या यादीत टाकलं आहे. त्याच बरोबरीने महाराष्ट्रातील १८ मंत्र्यांची नावंही या थकबाकीदारांच्या यादीत आहेत. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी बीएमसी कडे या बाबत माहिती मागवली होती.
या आरोपांनंतर शासकीत पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे कळते. या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना राज्य सरकार ने असे स्पष्ट केले आहे की पाणी बिलांमध्ये तफावत आढळल्यामुळे महापालिकेला बिलाचा भरणा केलेला नाही.
