काँग्रेसच्या सात उमेदवारांची नवी यादी आज प्रसिद्ध
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज सात उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेश, पंजाब, बिहार व जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या यादीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय
माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांना पंजाबच्या आनंदपूर साहिबमधून, शाश्वत केदार यांना बिहारच्या वाल्मिकी नगरमधून तर रिगजिन स्पालबार यांना जम्मू-काश्मीरच्या लडाखमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शैलेंद्र पटेल यांना मध्य प्रदेशच्या विदिशामधून, मोना सुसतानी यांना मध्य प्रदेशच्या राजगडमधून तर केवल सिंह धिल्लों यांना पंजाबच्या संगरुरमधून तिकीट देण्यात आलं आहे.
#congress #maharashtravarta