Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लॉकडाऊन नंतर नव्या नाटकाचा मुहूर्त करणारे “काॅफी आणि गोडवा” ठरले पहिले मराठी नाटक

नाशिक येथे पार पडला मुहूर्त व तालीम प्रारंभ समारंभ

नाशिक: काळ कितीही कठिण असला तरी सुद्धा कलाकार हा आपली कला चिरंतर ठेवत असतो, असं म्हणून नव्या उमेदीने लीनाई क्रिएशन आणि मनश्री आर्टस् ग्रुप नाट्यप्रेमींसाठी लवकरचं रंगभूमीवर नवीन नाटक घेऊन येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपण सर्वच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रासलो आहोत परंतु या लॉकडाऊन च्या काळात वेळ सत्कारणी लावत लीनाई क्रिएशन आणि मनश्री आर्टस् ग्रुप नाट्यप्रेमींसाठी लवकरचं रंगभूमीवर “काॅफी आणि गोडवा” हे प्रायोगिक नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचा तालीम मुहूर्त आणि संहिता पूजन सोहळा दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता स्वप्नपूर्ती, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी पार पडला.

या सोहळ्यास नाटकाचे लेखक व अभिनेते. संकेत सीमा विश्वासराव, दिग्दर्शक तेजस बिल्दीकर, अभिनेत्री वैभवी चव्हाण, सूत्रधार आदित्य संजयराव, तसेच नाटकाचे निर्माते सागर सं. लीना पाटील, संतोष जढाळ ई. उपस्थित होते. कॉफी आणि गोडवा ह्या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिक येथे होणार असून लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला एक वेगळी प्रेमळ नाट्य मेजवानी असेल. संकेत विश्वासराव आणि वैभवी चव्हाण ह्यांनी ‘काळ’ ह्या मराठी भयपटात यापूर्वी एकत्र काम केले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी रंगमंचावर एकत्र येत आहे. ह्या नाटकाची तालीम ही कोविड १९ साठी लागु केलेल्या सर्व सरकारी नियमांचे पालन करूनच होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

तंत्रज्ञ – प्राची कुलकर्णी , आदित्य धलवार, कुंतक गायधनी, अरुंधती कामठे, तिथी घाडी, मनश्री आर्टस् आणि लीनाई क्रीएशन्स च्या वतीने ऑनलाईन हजेरी दर्शविली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *