Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“ह्या माणसाचं स्वतःचं काहीच नाही” – निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

“ह्या माणसाचं स्वतःचं काहीच नाही” – निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हा आणि कसे आमदार होणार या प्रश्नाचं गूढ आज संपलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितले की, “कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.” हा निर्णय जाहीर झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी एक तिखट ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाण साधला. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, “मुख्यमंत्री पद काँग्रेस ncp मुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा… ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही.”

पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहे उद्धव ठाकरे. सगळं बसल्या बसल्या मिळालं आता आमदारकी पण बसल्या ठिकाणी राज्यपालांनी दिली. भिक मध्ये मिळालेल्या ह्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा.”

कोरोनाचा संकट लांबण्याची चिंन्हे आहेत. त्यामुळे घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंना या मार्गाने आमदार करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *