Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

औरंगाबाद, दि. १०: निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या निलगिरी, शिवबाभूळ आदी वृक्षांमध्ये वाढ करून इतर वन्यजीवांना आवश्यक असलेल्या वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. यामध्ये विविध पक्षांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावा, असेही उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्तूविशारद धीरज देशमुख, श्री.दवे यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *