मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेच्या माध्यमातून करुन उत्पादन शुल्क विभागाने कर चोरीला आळा घालावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेच्या माध्यमातून करुन उत्पादन शुल्क विभागानं कर चोरीला आळा घालावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूल वाढीसाठी उपाययोजना कराव्यात, असंही त्यांनी सांगितलं.
(सौजन्य – AIR)