९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात
उस्मानाबाद: ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादच्या संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये सुरुवात झाली आहे. सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली.
दुपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक ना. धो महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या तीन दिवसीय संमेलनात, वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलनं अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.