Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करू शकत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” मिसेस माजी मुख्यमंत्री अमृता फडणवीस भडकल्या

“तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करू शकत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” मिसेस माजी मुख्यमंत्री अमृता फडणवीस भडकल्या

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे वैयक्तिक टीका केली होती. याची दखल मुख्यमंत्री किंवा त्यांच्या ‘सौं’ नी घेतली नाही पण शिवसेनेच्या रणरागिणी यामुळे दुःखावल्याचे पाहायला मिळाले. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काल पुण्यातील महिला शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला चपला मारल्या होत्या. याबाबतचा व्हिडिओ ही दिवसभर समाज माध्यमांवर फिरत होता.

आज पुनः एकदा अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सोबत हाच व्हिडिओ जोडत म्हटले की, “तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करू शकत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हा हल्ला आहे, नेतृत्व नाही.”

पुढे त्यांनी एक छोटासा शेर म्हटला आहे ज्यात त्या म्हणतात की, “दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका,
हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !”

याबाबत हा वाद सध्यातरी एकतर्फी दिसत आहे कारण यावर न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाष्य करताना दिसत आहेत. या ट्विट वरूनही अनेक जण अमृता फडणवीस यांना ट्रोल करताना दिसत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *