मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा आणि आंबिवली या दोन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
