Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा केंद्रीय अर्थसंकल्पाने काय केलं स्वस्त आणि काय केलं महाग?

पहा केंद्रीय अर्थसंकल्पाने काय केलं स्वस्त आणि काय केलं महाग?

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज दिनांक ५ जून रोजी सकाळी ११ वाजता मोदी सरकार दोन चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांची तशी निराशाच केलीय. आयकर स्लॅब मध्ये बदल होईल अशी अटकळ बांधली जात होती पण ती फोल ठरली. त्याच वेळी सरकारने श्रीमंतांवर करवाढीची तलवार उपसली आहे. इंधन व सोन्यावर करवाढ केल्यामुळे महागाई वाढू शकते असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

चला तर मग पाहुयात या अर्थसंकल्पाने कोणत्या गोष्टी स्वस्त व कोणत्या महाग केल्या

महाग –

पेट्रोल-डिझेल

सोनं

डिजीटल कॅमेरा

परदेशी पुस्तकं, कागद

काजू

पीव्हीसी पाईप

ऑप्टिकल फायबर

सीसीटीव्ही कॅमेरा

आयात फर्निचर

एअर कंडिशनर

गाड्यांचे सुट्टे भाग

सिंथेटिक रबर

प्लास्टिक

व्हीनायल फ्लोअरिंग

बांधकामाच्या टाईल्स

स्वस्त –

घर

विमा

इलेक्ट्रिक कार

नाफ्ता

मोबाईल फोन चे चार्जर व बॅटरी

सेट टॉप बॉक्स

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *