लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा उत्तम असा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ, लाभांश देणाऱ्या अन् वाढतच जाणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकीस प्राधान्य
मुंबई, दि. २३ : बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने बडोदा बीएनपी परिबा डिव्हीडंड यील्ड फंड सुरू करण्याची घोषणा केली. मुदतमुक्त श्रेणीतील हा फंड प्रामुख्याने लाभांशरुपाने उत्पन्न देणाऱ्या समभागांत गुंतवणूक करणार आहे. भांडवल वृध्दी आणि लाभांशाच्या माध्यमातून उत्पन्न अशा प्रकारे समभागांतील गुंतवणूक संपत्तीची निर्मिती करत असते. सातत्याने लाभांश देणाऱ्या आणि वृध्दी दर्शविणाऱ्या कंपन्यात गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट हे धोरण ठेवते.
नवीन फंड ऑफर (NFO) २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू राहील.
योजनेचा गोषवारा : स्थिर आणि निधीच्या प्रवाहाबाबत अंदाज व्यक्त करता येणाऱ्या तसेच समभागधारकांना नियमित लाभांश वाटपाचे प्राधान्य देणारे व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट बडोदा बीएपी पारिबाचा हा डिव्हीडंड यील्ड फंड ठेवतो. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना नियमित लाभांश आणि बायबँकच्या माध्यमातून लाभ प्रदान करणाऱ्या वृध्दीरुपी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या धोरणाचा अवलंब केला जाणार आहे.
उच्च प्रमाणात रोख रक्कमेचा प्रवाह असलेल्या आणि नियमित लाभांश वाटपाचा इतिहास असणाऱ्या कंपन्यांतच हा फंड आपला निधी गुंतविणार आहे. हा फंड वाजवी मूल्य पातळीवर असलेल्या कंपन्यांचा परंतु त्यांच्या बाजार भांडवली मूल्यावर आधारीत नसलेला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पाच-टप्प्यांवरील निवड प्रक्रियेचा अवलंब करतो. तसेच लाभांशाच्या सापळ्यात अडकवू पाहणाऱ्या कंपन्यांना टाळणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ :
1. उच्च मुक्त रोख प्रवाह : लाभांश देणाऱ्या कंपन्यांकडे अधिक मूक्त रोख प्रवाह असतो, ज्यामुळे त्यांच्या समभागांच्या किमतीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
2. प्रवर्तकांची समान धारणा : भागधारकांना लाभांश देऊन पुरस्कृत करणारे प्रवर्तक अल्पसंख्याक भागधारकांसोबत समान धारणा दर्शवतात.
3. कार्यप्रदर्शनावर प्रकाशझोत : वित्तीय वर्ष 2009 पासून 16 पैकी 10 वर्षांमध्ये, निफ्टी डिव्हीडंड ऑपॉच्युनिटीज 50 TRI निर्देशांकाने निफ्टी 500 TRI निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. निफ्टी 500 TRI मध्ये ऑक्टोबर 2007 मध्ये गुंतवलेले एक लाख रुपयाचे मूल्य आज 6.7 लाख झाले असते, तर निफ्टी डिव्हीडंड ऑपॉच्युनिटीज 50 TRI मध्ये गुंतवलेल्या याच रक्कमेचे मूल्य 31 जुलै 2024 पर्यंत 10.4 लाख रुपयांपर्यंत असते. (स्रोत: एनएसई आणि अंतर्गत संशोधन. भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकू शकते किंवा नाही.)
4. विविधीकरण : विविध क्षेत्रांमध्ये आणि बाजार भांडवलामध्ये राखलेले वैविध्य, जोखीम कमी करणे आणि संभाव्य परतावा वाढवणे या धोरणांचा फंडाला फायदा होतो.
बडोदा बीएनपी पारिबा डिव्हीडंड यील्ड फंडाचे व्यवस्थापन अनुभवी तज्ञ शिव चनानी (Chanani) हे करणार आहेत. ते बडोदा बीएनपी परिबा एएमसीमध्ये वरिष्ठ फंड व्यवस्थापक (इक्विटी) असून त्यांना गुंतवणूक क्षेत्राचा 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.
नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना बडोदा बीएनपी परिबा एएमसीचे सीईओ सुरेश सोनी म्हणाले, “आर्थिक वर्ष 2020 पासून निफ्टी 500 निर्देशांकातील कंपन्यांचे अवलोकन केले असता, नियमित लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा समभागांनी लाभांश न देणाऱ्या कंपन्यांपेक्षा सरासरी अधिक परतावा दिलेला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, लाभांश देणाऱ्या या कंपन्यांचा सरासरी समभागावरील परतावा (आरओई) 20.5 टक्के असून लाभांश न देणाऱ्या कंपन्यांसाठी हाच परतावा 13.4 टक्के * होता. भागधारक-अनुकूल व्यवस्थापन पद्धतींसह उच्च-गुणवत्तेच्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याचे फंडाचे उद्दिष्ट असणार आहे.”
31 मार्च 2024 पर्यंतची आकडेवारी. *स्रोत: Ace इक्विटी आणि अंतर्गत माहिती.
