Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिल्याने सगळ्याच राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. त्यातच मंगळवारी (२६ मार्च) सत्ताधारी भाजपने आपल्या ४२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ यांच्यासह ४२ नेत्यांची नावे स्टार प्रचारक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या नावाच्या समावेश करण्यात आलेला नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *