Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगाव येथे होणारा यंदाचा शौर्यदिन सोहळा रद्द

भीमाकोरेगाव इथं होणारा यंदाचा शौर्यदिन सोहळा कोरोना संसर्गामुळे रद्द

कोरोना संसर्गामुळे यावर्षीचा भीमाकोरेगाव इथं होणारा शौर्यदिन सोहळा जिल्हा प्रशासनानं रद्द केला असून हा सोहळा अनुयायांना ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.

भीमा कोरेगाव परिसरात सभा, स्टॉल यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. समस्त आंबेडकरी समुदायानं ‘माझा समाज, माझी जवाबदारी’ या अभियानानुसार भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाणदिन अभिवादनाप्रमाणंच शौर्यदिन अभिवादन घरीच करून आदर्श निर्माण करावा असं आवहन समितीनं केलं आहे.

या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमं, ऑनलाईन पोर्टल आणि  दूरचित्रवाहीन्यांवरून करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *