मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आ. विनायक मेटे यांच्या पुढाकाराने ५ जून रोजी बीड ला होणार मोर्चा
बीड, दि.२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड येथे येत्या ५ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे निमंत्रक आमदार विनायक मेटे यांनी, काल बीड येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मराठा आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका मेटे यांनी केली. समाजानं मूक मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई लढली, मात्र अद्यापही हाती काहीच न पडल्यानं, आता मराठा क्रांती संघर्ष मोर्चा – लढा आरक्षणाचा, हे आंदोलन सुरू केलं आहे. याचाच पहिला भाग म्हणून बीड येेथे मोर्चा काढला जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोर्चात शंभर टक्के खबरदारी घेण्यात येणार असल्याचं, मेटे यांनी सांगितलं.
