बीड जिल्ह्याचा मागासलेपण असल्याचा कलंक कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढील पाच वर्ष आपण काम करू – धनंजय मुंडे
बीड: बीड जिल्ह्याचा मागासलेपण असल्याचा कलंक कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढील पाच वर्ष आपण काम करू, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
धनगर समाज कर्मचारी महासंघ बीड जिल्हा यांच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षक गुणवंत कर्मचारी व समाज भूषण पुरस्कार मिळालेल्या पुरस्कारार्थींचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मुंडे यांनी सत्कार केला.
