Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

 आज राष्ट्रीय बालिका दिन! देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

 आज राष्ट्रीय बालिका दिन! देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बालिकांचे अधिकार, मुलींच्या शिक्षणाचं तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाचं महत्व, याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने २००८ पासून दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

बालिकांप्रति समाजाचा दृष्टीकोन सुधारुन मुलींविषयी भेदभावाचं निर्मूलन करणं हा यापाठीमागचा प्रमुख हेतू आहे. बालिकांच्या कल्याणासाठी सरकार बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उडान योजना, शैक्षणिक संस्थांमधे मुलींना राखीव जागा, अशा विविध योजना राबवत आहे.

महिला भ्रूण हत्या, मुलींचं घटतं गुणोत्तर अशा विषयांवर जनजागृती घडवून आणत आहे. बालिका दिनाचं औचित्य साधून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आज आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत उमंग हा रंगावली उत्सव साजरा करत आहे. देशभरात ५० पेक्षा जास्त ठिकाणी बालिका दिनाच्या मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात येत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *