Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांसाठी आणली नवी गुंतवणूक योजना; जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटतर्फे लन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंडाचा शुभारंभ वर्तणुक शास्त्रावर आधारित भारताचा पहिला बॅलन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंड

वैशिष्ट्येः
१) एनएफओ २४ नोव्हेंबर २०२३ ला गुंतवणूकीसाठी सुरू होणार असुन आणि ८ डिसेंबर २०२३ ला बंद होणार आहे.

२) वित्तीय निकषांबरोबरच गुंतवणूक मानसशास्त्राचा वापर करत गुंतवणूक धोरण आखणारा भारतातील पहिला बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड

३) बाजारातील आंतरिक मूल्य, मानसशास्त्रीय कसोट्यांनुरुप संतुलन, मालमत्तेचे वाटप आणि पोर्टफोलिओचे फेरसंतुलन यासारख्या निकषांआधारे गुंतवणूक निधीचे वाटप धोरण

४) निफ्टी फिफ्टी हायब्रीड कम्पोझिट डेट ५०:५० इंडेक्स हा या फंडासाठी संदर्भ निर्देशांक

५) गुंतवणूकीसाठी किमान अर्ज रक्कम ५०० रु. (त्यानंतर एक रुपयाच्या पटीत) आणि अतिरिक्त अर्ज रक्कम किमान १०० रु. (त्यानंतर एक रुपयाच्या पटीत)

मुंबई/पुणे, दि. २१: बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांसाठी बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंड या नवीन फंडचा प्रारंभ केला असून ही मुदतमुक्त श्रेणीतील लवचिक गुंतवणूक योजना आहे. समभाग आणि समभागांशी संबंधित वायदे (डेरेव्हेटीव्हज) तसेच स्थिर उत्पन्न घटक यातच गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे.

वर्तणुकीशी संबंधित मानसशास्त्र आणि वित्तीय अंतरंगाशी संबंधित निकष यांच्या आधारे तयार केलेल्या विशेष गुंतवणूक पध्दतीचा वापर बजाज फिनसर्व्ह (बॅफ) करते. गुंतवणूकीची ही पध्दत वापरल्याने बाजारातील अस्थिरतेतेतून व्यवस्थितरित्या मार्गक्रमण करणे आणि जास्तीत जास्त परतावा हे लाभ गुंतवणूकदारांना मिळू शकतात. निधीचे वाटप करण्यासाठी केवळ संख्यात्मक प्रारूप (मॉडेल) वापरण्याऐवजी बजाज फिनसर्व्ह एएमसीचा गुंतवणूक चमू वर्तणुकीशी संबंधित बाबींचेही विश्लेषण करतो आणि त्यामुळे दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळण्यास मदत होते.

मूलभूत निकष, गत कामगिरी आणि संख्यात्मक प्रारुप यांच्याआधारे गुंतवणूक निधीचे वाटप ही पारंपारिक पध्दत वापरली जाते. परंतु निधीचे वाटप आणि गुंतवणूकीची वेळ निश्चित करण्यासाठी वर्तणुकशास्त्रावर आधारित प्रारुपांची मदत घेण्यावर बजाज फिनसर्व्ह एएमसीचा गुंतवणूक चमू अधिक विश्वास ठेवतो.

भविष्यातील प्रतिसमभाग कमाई, वाढीचा अंदाज आणि व्याजदर याआधारे बजाज फिनसर्व्ह एएमसी बॅफचे मॉडेल योग्य बाजार मूल्य निश्चित करते आणि त्याआधारे मुख्य गुंतवणूक धोरणाची दिशा निश्चित केली जाते. फंडासाठी तयार करण्यात आलेले वर्तणुक निकष बाजारातील अस्थिरतेतून वाटचाल करण्यास मदत करतात आणि योग्य वेळेला प्रवेश करणे आणि बाहेर पडणे यात उत्तम ताळमेळ साधत अधिकाधिक परतावा निश्चित करण्यासही हातभार लावतात. तसेच हे निकष समभागातील गुंतवणूकीला दिशा दाखवतात. बाजार निच्चांकी पातळीवर असताना गुंतवणूक वाढविली जाते आणि बाजाराचे मूल्यांकन उच्च पातळीवर असताना गुंतवणूकीत कपात केली जाते.

नवीन फंडाच्या शुभारभप्रसंगी बोलताना बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ श्री. गणेश मोहन म्हणाले, “बाजारात आम्ही नवीन खेळाडू असलो तरी बाजाराकडे अतिशय नव्याने पाहण्याची आम्हाला संधी आहे. आमची बॅफ ही या दृष्टीकोनाचे एक सूंदर उदाहरण आहे. आमच्या दृष्टीकोनात वर्तणुक शास्त्र आणि वित्तीय निकष यांचा उत्तम ताळमेळ साधला जातो आणि त्यामुळे आम्हाला गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होते. आमती इनक्यूब ही आगळीवेगळी गुंतवणूक पध्दत माहिती, गुणवत्ता आणि वर्तणुक यांचा मिलाफ घडवून आणत अल्फा परतावा प्रदान करते. आमच्या जवळपास सर्व गुंतवणूक प्रकारांसाठी हा मुख्य आधार ठरलेला आहे आणि आमच्या बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडात वर्तणुकीशी संबंधित निकषांचा अतिशय सकारात्मक परिणाम आपणा सर्वांना पाहता येईल. मला खात्री आहे की, वर्तणुकीशी संबंधित अनेक संकल्पना आणि गुंतवणूक प्रकार आपणास पाहण्यास मिळतील आणि भविष्यात त्यांचीच चर्चा राहील.”

बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटचे सीआयओ निमेश चंदन म्हणाले “एखादा जमाव प्रत्येकवेळी चुकीचा ठरु शकत नाही. त्यामुळे शेअरबाजाराने उसळी मारल्यानंतर विक्री करणे आणि बाजारात घसरण होताच प्रत्येक वेळी खरेदी करणे हा निधी गुंतवणूकीचा सर्वोत्तम दृष्टीकोन ठरु शकत नाही. जमावाने हव्यासापोटी अथवा भितीपोटी दिलेला प्रतिसाद ओळखणे अतिशय गरजेचा असून त्याचा लाभ घेतला पाहिजे. मूलभूत आर्थिक निकषांचा अभ्यास आणि बाजाराचे वर्तणुक चक्र याआधारे आम्ही मालमत्ता गुंतवणूक धोरण विकसित केलेले आहे. मूलभूत विश्लेषणाचे प्रकार बाजाराचे न्याय मूल्य निश्चित करण्यास मदत करते तर वर्तणुक विश्वेषण पध्दत बाजाराचा तेजी अथवा मंदीकडे झुकलेल्या धारणेतील बदल आम्हाला उलगडून दाखवितो. या दोन्ही संकेतांकांचा एकत्रित वापर केला असता बाजाराने प्रमाणापेक्षा अधिक किंवा प्रमाणापेक्षा कमी प्रतिसाद दिला याचे आकलन होते.”

नवीन फंडातील समभाग विभागाचे व्यवस्थापन संयुक्तपणे निमेश चंदन आणि सौरभ गुप्ता हे सांभाळणार असून डेट विभागाचे व्यवस्थापन सिध्दार्थ चौधरी हे सांभाळतील. नवीन फंड गुंतवणूकीसाठी २४ नोव्हेंबरला सुरू होत असून ८ डिसेंबर २०२३ ला बंद होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *