Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतला अखेरचा निरोप; वयाच्या १००व्या वर्षी प्राणज्योत मालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

पुणे, दि.१५: आपल्या ओजस्वी वाणीने छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाचे लेखक, भव्य दिव्य अशा ‘जाणता राजा’ या महानाट्याचे जनक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे वयाच्या १०० व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मागील काही काळापासून प्रकृती संबंधी तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पुण्यातील मास्टर दीनानाथ मंगेशकर इस्पितळात उपचार चालू होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सरसंघचालक मोहन भागवत आपल्या शोकपर संदेशात म्हणाले की, “पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *