औरंगाबादच्या जिल्हाधिकार्यांचे यांचे बर्ड फ्लूबाबत मोठे विधान
औरंगाबाद, दि. १४ : औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही, मात्र इतर जिल्ह्यातल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात यंत्रणा सतर्क आणि सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.
जिल्ह्यात कोणत्याही गावांत कोंबडी, कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये मरतुक आढळल्यास, तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती द्यावी. मृत पक्ष्याला हात लावू नये तसंच परस्पर विल्हेवाट लावू नये, असं औरंगाबादचे पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी यांनी सांगितलं.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात बाधित क्षेत्रात कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट सुरू करण्यात आली आहे.
