‘जिवंतपणी काकाला छळणारे वारसदार तुम्ही’ – आशिष शेलारांची धनंजय मुंडेंवर बोचरी टीका
२०१९च्या लोकसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान जसजसे जवळ येत आहे, तस तसे राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेतेमंडळी सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे.
एका प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की धनंजय मुंडे स्व. गोपिनाथराव यांचे वारसदार आहेत. त्याचाच आधार घेत आशिष शेलार यांनी ट्विट करत स्व. गोपिनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नात्याचा उल्लेख करत धनंजय हे जिवंतपणी काकाला छळणारे वारस ठरले आहेत, असा आरोप केला आहे.
आशिष शेलार ट्विटमध्ये असे म्हणाले की,
तमाच्या तळाशी दिवे लागले.
जिवंतपणी काकाला छळणारे वारसदार ठरले..आता पूजा काकाचे रोज पुतळे..
स्व. गोपिनाथराव यांचा वारसदार आहे म्हणे पुतण्या..
जाणतेराजे असे कालच कुठेतरी वदले..
जाणतेराजे जे बोलतात त्याचा विरुध्द अर्थ घ्यावा..
असे महाराष्ट्राचे आहे कधीच ठरले!
आशिष शेलार यांच्या टिकेला धनंजय मुंडे काय उत्तर देणार, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
तमाच्या तळाशी दिवे लागले.
जिवंतपणी काकाला छळणारे वारसदार ठरले..आता पूजा काकाचे रोज पुतळे..
स्व. गोपिनाथराव यांचा वारदार आहे म्हणे पुतण्या..
जाणतेराजे असे कालच कुठेतरी वदले..
जाणतेराजे जे बोलतात त्याचा विरुध्द अर्थ घ्यावा..
असे महाराष्ट्राचे आहे कधीच ठरले!#ChowkidarकेSideEffects— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 15, 2019
