मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी घेतली तिसऱ्यांदा शपथ
आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.
उप राज्यपाल अनिल बैजल केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे.
यात मनिष सिसोदिया, सत्येंदर जैन, गोपाल राय, कैलाश गलहोत, इम्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.
