Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे ॲड. अनिल परब विजयी; जाणून घ्या भाजपच्या उमेदवाराला किती मते मिळाली

विजयी उमेदवार परब यांना मिळाली ४४ हजार ७८४ मते

नवी मुंबई, दि. ०१: विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६४ हजार २२२ मते वैध ठरली तर ३ हजार ४२२ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ३२ हजार ११२  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :- ४४ हजार ७८४ (विजयी)

2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- १८ हजार ७७२

3) योगेश बालकदास गजभिये  :- ८९

4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- ३९

5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- ११

6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- ४६४

7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- २६

8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- ३७

पहिल्या पसंतीची ४४ हजार ७८४ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *