माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ‘ईडी’ ने दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
मुंबई, दि.११: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
