Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआय चा छापा; खा. राऊत म्हणाले, “कुछ तो गडबड है..”

खा. संजय राऊत म्हणाले कुछ तो गडबड है !

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध काल FIR दाखल केल्यानंतर आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभाग CBI नं देशमुख यांच्या मालमत्तांची झडती घ्यायला सुरुवात केली आहे.

अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोलच्या घरी तसेच मुंबईतल्या सुखदा सोसायटीमधल्या घरी सीबीआयने छापे टाकले आहेत. CBI नं देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम ७ आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १२० ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर गेल्या ५ एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

ही कारवाई झाल्या नंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या कारवाई वरच शंका उपस्थित केली. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *