अमृता फडणवीस उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष म्हणाल्या वाईट नेता, ट्रोलर म्हणाले “ते जाऊद्या भिंतीवर कोणी लिहिलं ते आधी सांगा”
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुनः एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विटरद्वारे तोफ डागली आहे. यावेळी त्या जरा जास्तच खवळलेल्या जाणवल्या. त्या म्हणाल्या की, “वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा गुन्हा नाही, पण अशा सोबत राहणे हा नक्कीच आहे. जागा हो महाराष्ट्रा!”
Having a bad leader was not Maharashtra’s Fault – But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019
गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने पोलिसांची बँक खाती अक्सिस बँकेकडून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये वर्ग करण्याच्या बाबत प्रस्ताव आणल्याची वार्ता होती. या बातमीमुळे भडकलेल्या अमृता फडणवीसांनी हे वक्तव्य केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
मिसेस फडणवीस यांच्या या ट्विटवर अनेकांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे.
ते जाऊ द्या भिंतीवर कोणी लिहिलं आहे ते सांगा ?
— 𝓓𝓲𝓷𝓮𝓼𝓱 (@WaghodeDinesh) December 29, 2019
https://twitter.com/iamtssh/status/1210990451399876608?s=19
https://twitter.com/Sachinkumar1308/status/1211157821498068992?s=19
Axis बँक बंद पडल्या शिवाय समाधान मानणार नाहीत वाटते मॅडम 😂
— सुशिक्षित बेरोजगार (@be_rose_gaar) December 28, 2019
