जाता जाता अमृता फडणवीसही शायरीतून म्हणाल्या “मी पुन्हा येईन…”
मुंबई/नागपूर: गत विधानसभेचे जसे देवेंद्र फडणवीस हिरो होते तश्या त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीसही या न त्या कारणाने सतत चर्चेत राहिल्या. गेल्या ५ वर्षात त्यांनी गायन क्षेत्रात आपलं पाऊल रोवण्याचा प्रयत्न केला. एका बॉलीवूड सेलिब्रिटी च्या तोडीची त्यांची जीवनशैली राहिली.
पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर,
खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे! Thanks Mah for memorable 5yrs as your वहिनी !The love showered by you will always make me nostalgic! I tried to perform my role to best of my abilities-with desire only to serve & make a positive diff🙏 pic.twitter.com/ePUzQgR9o5— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 26, 2019
काल अजित पवारां पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर अमृता फडणवीस सोशल मीडिया वर व्यक्त झाल्या. ज्यात त्यांनी एक शायरी करत आम्ही पुन्हा येऊ असा विश्वास व्यक्त केला.” तसेच त्यांनी साऱ्या महाराष्ट्राचे आभारदेखील मानले. गेल्या ५ वर्षांच्या वर्षा बंगल्यावरील आठवणी अमृता फडणवीस यांना सतत आठवत राहतील इतकं नक्की.
